झोळी आत्मकथन पर कादंबरीचे परीक्षण….. गणेश शेलार सरांच्या नजरेतून…
झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे.....झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथना...