कन्यादान…
" पहिली बेटी घी की रोटी अन् पहिला बेटा भिकार चोट्या" असं म्हणतात तर ज्या मुलीला आपण तुपाची भाकर म्हणतो तिला तेवढ्या प्रेमाने, आपुलकीने वाढवतो त्याच मुलीला मोठं झाल्यावर तिचं कन्यादान करायचं? कन्यादान म्हणजे ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलो. तिला काही झालं तर डोळ्याला डोळा लागत नसे मग ती मोठं झाल्यानंतर तिला कोणाला तरी दान करायचं?
हा निसर्गाचा जगावेगळा खेळ आहे. स्वतःपेक्षा जास्ती जीव लावतो, आनंदाने प्रेमाने वाढवतो आपल्या काळजाचा तुकडा तिला करतो मग तिलाच का जावं लागतं सासरी? मुलापेक्षा मुलीला आईवडिलांची जास्ती काळजी असते. घरी पाहुणे आले अन् मुलाला म्हंटलं जा! दुध घेऊन ये तेव्हा मुलगा गलासात पैसे टाकून पाहुण्यांसमोर वाजवत जातो. अन् त्याच जागी मुलगी असेल तर ती आपल्या आईवडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून ओढणीत झाकून ग्लास घेऊन जाते.
अहो! इज्जत धुळीवर आणणारा मुलगा श्रेष्ठ की, आपल...