Vasanrao Naik : ‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’
वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ,कायदेतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या आड वळणावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात बंजारा समाजातील शेतकरी कुटुंबात फुलसिंग व होनुबाई नाईक यांच्या पोटी १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला.महानायक वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणूनही संबोधतात.काहींनी त्यांचे ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या...
