Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय
Article

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपायकर्करोग हा संपूर्ण जगातील सर्वात प्राणघातक आजार आहे आणि त्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि काही कर्करोग टाळता येतात. भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ती वेगाने वाढत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामने असा अंदाज वर्तवला आहे की देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२२ मध्ये १४.६ लाखांवरून २०२५ मध्ये १५.७ लाखांपर्यंत वाढेल.आयसीएमआरचा अंदाज आहे की भारतातील अंदाजे नऊ जणांपैकी एका व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोगाचे निदान होण्याची अपेक्षा आहे.देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या १५.३३ लाखांपेक्षा जास्त आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ ह...
आमचं यवतमाळ
Poem

आमचं यवतमाळ

आमचं यवतमाळआमचं यवतमाळसंजय दत्तने जरी घेतलं    उपहासाने नांवआम्हास मात्र प्रिय आहे       आमचं यवतमाळ गांवभाऊसाहेब पाटणकर,बापुजी अणे, जवाहरलाल दर्डाबावाजी दाते सारखावक्ता नाही खर्डाश्रद्धे विषयी बोलणे नाहीअंधश्रद्धेच्या विरोधी बाणाअभ्यासपूर्ण लिखाण ज्यांचेसुजाण डॉक्टर अशोक राणाढुमणापूरचा मारुती,जिनाचा गणपती,लोहाऱ्याचा महादेवकमी होते काय?                          तुम्हीबी लावलेच नां राजेहो,भुताच्या मंदीराले पायशहरामध्ये वाढत चाललायुवक-युवतींचा पसाराएकट्या "श्याम" च्या मागे पडल्या       ...
मी पाहिलेली दुर्गामाऊली…
Story

मी पाहिलेली दुर्गामाऊली…

मी पाहिलेली दुर्गामाऊली...शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथे हृदय संमेलनाच्या निमित्ताने जाणं झालं. तिथे जे काही अनुभव आले हे अगदी थोडक्यात सांगायचं तसं कठीणच. पण नवरात्राच्या निमित्ताने मी पाहिलेली दुर्गा मला नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. आघाद स्मरणशक्ती, अचंबित करणारी कृतिशीलता आणि शब्दातही मांडता येणार नाही अशी जिद्द असणारी ती अगदी तरतरीत आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पटपट चालत येऊन स्टेजवर खुर्चीत बसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या.कारण तिच्याकडे पाहिलं की देवानं तिला एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीने बनवले आहे हे नक्कीच लक्षात आलं. जिथे हट्टेकट्टे दोन हात, दोन पाय, डोळे इत्यादी असं समृद्ध शरीर दिलेलं असताना देखील आम्ही कधी त्या विधात्याचे आभार मानत नाही की त्यांची काळजी घेत नाही. कारण त्याचं मूल्य आम्हाला जाणवतच नाही. आमच्यासारख्या सर्वसामा...
१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा
News

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आ...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
News

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टीमुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर...
शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’
News

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’

शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकी सरकारी नोकरीत – ‘आईच्या कष्टाचं सोनं झालं!’चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गौरम्मा या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आईने आपल्या चारही मुलींना मोठं करून दाखवलं आहे. आर्थिक अडचणी, गरीबी, कष्ट यांना तोंड देत गौरम्मांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलं आणि आज त्याच मुलींनी सरकारी नोकरी मिळवून आईचं स्वप्न साकारलं आहे.गौरम्मांच्या दोन मुली सध्या पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत, तर उर्वरित दोन मुली शिक्षिका झाल्या आहेत. गावातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ही यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.“पुढचा जन्म असेल तर पुन्हा हीच आई मिळावी,” असं कौतुकाने सांगणाऱ्या गौरम्मांच्या मुली आपल्या यशाचं श्रेय पूर्णपणे आईला देतात. “आईने न थकता आयुष्यभर मेहनत केली, शिक्षणासा...
श्रीमंतांची फॅशन : गरीबांचे जेवण झुणका भाकर
Article

श्रीमंतांची फॅशन : गरीबांचे जेवण झुणका भाकर

झुणका भाकर या शब्दात महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सगळी कहाणी दडलेली आहे. शेतकऱ्यांच्या डब्यातला सोपा तुकडा, मजुराच्या पोटाला कळकळीने दिलेले सांत्वन, आणि जत्रा-उत्सवात वाटलेली साधी तृप्ती हे सर्व एका प्लेटमध्ये साठवलेले दिसते. पण आजच्या बदलत्या काळात हा साधा अन्नाचा तुकडा शहरातील बुटीक रेस्टॉरण्टच्या मेन्यूमध्ये ‘ट्रेंड’ म्हणून दिसतो. झुणका भाकरच्या इतिहासापासून त्याच्या सामाजिक व सांस्कृतिक अर्थापर्यंत, आणि या बदललेल्या रूपाचे दुःखद सत्य.झुणका भाकर: साधेपणातला शक्तीपोषक अन्नझुणका म्हणजे बेसन. भाकर म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा गहूची भाकरी. एकत्रितपणे हे असं अन्न आहे जे कमी खर्चात पौष्टिकता देतं. झुणक्यामध्ये प्रथिने, उर्जा या सगळ्याचं संतुलन साधलं जातं. शेतात राबणाऱ्या लोकांसाठी हे केवळ जेवण नाही ते तन-मनाला टिकवणारे अन्न आहे.गरिबांच्या आयुष्यात झुणका भाकरची भूमिकाशेतक...
ती खूप बदलली आहे
Poem

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहेसमांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचेमहत्व वाढले आहे..ती अबला नव्हेआता सबला झाली आहे..हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.दर गुरूवारी धावपळ करते..नारळ आणते..साखर आणते..आरतीसाठी पुढे सरते...सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..आता ती खूप बदलली आहे,कुंकूवाच्या जागी टिकली लावते.तिला कळालेय कपड्यांचे मोल,म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,मॅचिंगवर दक्षअसते.वाचनातही ती मागे नाही,ती वाचते प्रवासातहीवैभवलक्ष्मीची पोथी...दानातही ती कमी नाही,म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटतेश्रद्धेने व्रताच्या पोथ्या...हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुनती लिहू लागलीय आता२१ हजार वेळा गायत्रीमंत्रतिच्या नोटबूकात...तिला चांगला आवाज लाभलाय,म्हणूनच तर ती सत्संगात जाते,सुरेल आवाजात गाते...एवढेच...
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ
News

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळबीड : शहरात काल रात्री (गुरुवारी, ता. २५) एका तरुणाची हत्या झाली. मृतक यश देवेंद्र ढाका (वय २२) हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माने कॉम्प्लेक्स परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.माहिती नुसार, यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाढदिवस साजरा करताना वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी देखील यश आणि सूरज यांच्यात भांडण झाल्याची नोंद आहे. या भांडणामुळे दोघांमध्ये वैर निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात वाद पुन्हा उफाळून आला.वाद इतका तीव्र झाला की सूरजने सोबत असलेला धारदार शस्त्र बाहेर काढून थेट यशच्या छातीत दोन आरपार वार केले. या वारांमुळे यश लगेचच रक्तबंबाळ झाला आणि कोसळला. जखमी अवस्थेत त्याला तातडी...