फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!
फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!‘हम तो फकीर हैं…’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनगटावर दिसणाऱ्या महागड्या घड्याळामुळे नवीन वाद उसळला आहे. त्यांच्या जुन्या भाषणांतील ‘फकीरी’ संदर्भातील वक्तव्ये सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असून, त्याच दरम्यान मोदींनी घातलेल्या घड्याळाची किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रमांमध्ये एक खास घड्याळ परिधान करताना दिसत आहेत. हे घड्याळ ‘जयपूर वॉच कंपनी’ या भारतीय ब्रँडचे असून ‘Roman Bag’ या सिरीजमधील आहे. त्याची बाजारभावातील किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे.या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डायलमध्ये बसवलेले 1947 सालचे एक रुपयाचे नाणे. या नाण्यावर ‘चालणारा वाघ’ कोरलेला असल्याने ते अत्यंत प्रीमियम आणि ऐतिहासिक मूल्य असलेले मानले जाते. या नाण्यामु...









