अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) या पदावर अनिल भटकर हे सोमवारी रुजू झाले.
तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी हे या पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यावर काही दिवस प्रभार उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याकडे होता. श्री. भटकर यांनी श्री. लंके यांच्याकडून पदाचा कार्यभार घेतला. यापूर्वी श्री. भटकर हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत होते.
श्री. भटकर यांनी यापूर्वी महसूल खात्यात विविध ठिकाणी तहसीलदार व अनेक पदांवर प्रदीर्घ सेवा बजावली आहे. अमरावती येथे पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.