पिंपळखुटा/स्वाती इंगळे
सीईटी सेल, मुंबई यांचेकडून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक पदवी प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी व कृषी संलग्न यांच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील शासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ९ जुलै 2023 पर्यंत www.ug.agriadmission.in किंवा www.mahacet.org किंवा www.mcaer.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावयाचे आहे.दिनाक २३/७/२०२३ ,२८/७/२०२३,व ३/८/२०२३ या तारखांना गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रवेश फेरी होतील. तसेच ९ ऑगस्ट 2023 पासून जागेवरील प्रवेश फेरी होणार असून संस्था स्तरीय प्रवेश फेरी ११ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात होईल.
या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे बी. एस.सी.(ओनर्स) कृषी प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे .(सांकेतिक कोड १११४९) तरी अधिक माहिती करिता इच्छुक विद्यार्थ्यांनी योगेश मुंदे मोबाईल क्रमांक ७०२०२४६१०० तसेच प्रा.उमेश तलमले मोबाईल क्रमांक ७७९८६००१८६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य सी.यू. पाटील,अध्यक्ष श्री प्रशांत सेलोकर,उपप्राचार्य डॉ.शरद नायक यांनी केले आहे.