विभागीय माहिती उपसंचालक पदी अनिल आलुरकर रुजू
अमरावती, (गौरव प्रकाशन वृत्तसेवा) : येथील विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक पदावर अनिल आलुरकर आज रुजू झाले.
प्र. उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. श्री. आलुरकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मराठवाडा विभागात विविध जिल्ह्यांत, तसेच यवतमाळ जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. महासंचालनालयाच्या लोकराज्य विभागात उपसंचालक (प्रकाशने) या पदावरही त्यांनी कार्य केले आहे.
श्री. हर्षवर्धन पवार, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक संचालक विजय राऊत यांनी श्री. आलूरकर यांचे स्वागत केले.
प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ, लेखापाल श्रीमती विजया लोळगे, वरिष्ठ लिपिक दिनेश धकाते, वैशाली ठाकरे, कॅमेरामन नितीन खंडारकर, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झीमटे, सागर राणे, क.लिपिक रुपेश सवाई, सुधीर पुनसे, हर्षल हाडे, गजानन पवार, कांचन अंधारे यांच्यासह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.