📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीत २ तासांत खुनाचा उलगडा! थरारक पाठलागानंतर ३ आरोपी जेरबंद

On: July 5, 2026 7:32 PM
आम्हाला फॉलो करा:
Amravati Murder Case solved in 2 hours, Crime Branch arrested three accused after thrilling chase

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या वेगवान तपासाची प्रचिती दिली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका तरुणाच्या हत्येचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. आरोपी शहरातून चारचाकी वाहनाने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी जवळपास तासभर थरारक पाठलाग करून त्यांना बडनेरा वाय-पॉईंट येथे पकडले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शनिवार (४ जुलै) रात्री सुमारे ११.३० वाजता विद्याभारती कॉलेज परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मृत तरुणाची ओळख जायेद हुसेन खान (वय २८, रा. पाकिजा कॉलनी, अमरावती) अशी झाली. प्राथमिक तपासात धारदार चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध

घटनेनंतर गुन्हे शाखेचे पथक तातडीने तपासाला लागले. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. आरोपी शहराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.

अखेर बडनेरा वाय-पॉईंट येथे आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

क्षुल्लक वादातून घेतला जीव

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृतक आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे समोर आले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपींनी धारदार चाकूने वार करून जायेद खानची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी

  • शेख इम्रान शेख महमूद उर्फ गोलू कुरेशी (३०)
  • शेख समीर शेख जुम्मन (३२)
  • शेख अमीन शेख जब्बार (३४)

मुख्य आरोपीवर आधीही खुनाचा गुन्हा

पोलिसांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी शेख इम्रान उर्फ गोलू कुरेशी याच्याविरुद्ध यापूर्वी यवतमाळ येथे खुनाचा गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची माहिती समोर आली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. अवघ्या दोन तासांत आरोपींना अटक करण्यात यश आल्याने अमरावती पोलिसांच्या वेगवान तपासाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now