- आदर्श राजमाता
- सिंधखेडची लेक लखुची
- भार्या शहाजी राज्याची।
- आदर्श राजमाता जिजाऊ
- थोर शिवाजी राजांची।।
- सरदारांची लाडकी बेटी
- काय कमी तिजला?
- पट्टा, भाला, घोडसवारी
- शिकली युद्धकला।।
- दुःखाचा डोंगर कोसळला
- आप्तजनांच्या हत्येने।
- डगमगली ती नाही तरीही
- सत्कार्य केले निष्ठेने।।
- आद्यगुरु तु बालशिवाला
- सुसंस्काराने मढविले।
- पाश तोडण्या परदास्याचे
- अन्यायाशी लढविले।।
- जातीपातीच्या तमोयुगात
- पेरली तु समता।
- अठरापगड मावळ्यांना दिली
- मायची ममता।।
- गुलामीच्या पहारीचा संकेत
- पायदळी तुडवला।
- फिरवून नांगर सोन्याचा
- इतिहास नवा घडविला।।
- संघर्षाची होती मालिका
- जीवनी घनअंधार।
- शतसंकटात शिवबाच्या होती
- तुच एक आधार।।
- सुराज्याची संसद आणि
- न्यायालय तू होती।।
- महाराष्ट्र मातीला दिले तू
- शिव-शंभो द्वी छत्रपती।।
- अनंत उपकार तुझे आम्हावर
- आजन्म फिटणार नाही ।
- काळजावर कोरलेलं नाव जिजाऊ
- काही केल्या मिटणारच नाही।।
-प्रा. रमेश वरघट
- करजगाव ता. दारव्हा जी. यवतमाळ
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
-बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–