‘आबा’ धाबी
गप्पाटप्पा
मनुष्य प्राणी प्रथम बोलायला शिकला,मग लिहायला शिकला.मग बोललेले लिहायला लागला,शिकलेले लिहायला लागला आणि मग बोललेले शिकलेले एकत्रच लिहायला लागला.कालांतराने न शिकलेलेही लिहायला लागला.एका शब्दाला तो काही काम नसतांना दुसरे शब्द लावायला लागला.नुसती ‘लावालावी’.कठीण वाटते ना वाटणारच.कारण मराठी भाषा आपणास बोलायला जरी सोपी वाटत असली तरी लिहायला फार कठीण आहे.भलेभले जे मराठीच्या पेप्रात नापास झाल्ते त्यांना विचारा. आता हेच पाहाना….
घरबीर
मला तुझे ‘घरबीर’ दाखवशील कां नाही मित्रा.’घर’ ठीक आहे पण नंतरच्या ‘बीर’ ला काही अर्थ आहे काय भौसाहेब?घर दाखविणाराही ‘घरबीर’ मधलं हे ‘बीर’ कधी दाखवत नाही.अन पाहणाराही कधी ‘बीर’ दाखव म्हणून हट्ट करीत नाही.आहे ना गम्मत.

लिंबूटिंबू
लिंबू ठीक आहे पण टिंबू म्हणजे काय याचा अर्थ कोणालाही माहीत नसतो तरीपण आपण त्या टिंबूला चालवून घेतच असतो ना.

गोडधोड
आज काहीतरी गोडधोड झालं पाहिजे बाबूराव. गोड काय असते त्याची चव वगैरे सर्वांनाच माहित असते.पण व्हाट इज ‘धोड’.ह्या धोडचा मतलब देवादिकांनाही ही ठावूक नसावा.धोड ह्या शब्द मानवाने कुठून आणला हे त्याचे त्यालाच माहीत.

आडवातिडवा
खाटेवर मस्त आडवातिडवा झोपला आहे लेकाचा.आडवा शब्द सर्वच जाणतात पण ‘तिडवा’.तिडवा शब्दाचा अर्थ कोणाला माहित असेल असे वाटत नाही.आपल्याला काय करायचे झोपेना लेकाचा ‘आडवातिडवा’

उष्टीमाष्टी
यामध्ये ‘माष्टी’चा अर्थ कोणाला माहित आहे?एकमेकाची ‘उष्टी’ सर्वच काढतात पण ‘माष्टी’.’गोड’ शब्दांचा ‘धोड’ शब्द हा चमचा असावा.मोठमोठे शब्द आपल्यासोबत असे चमचे वागवितांना दिसतात.तसेच इतरही शब्दांचे आहे.आडवा चा चमचा तिडवा,लिंबूचा चमचा टिंबू वगैरे…वगैरे…

तंबाखूफंबाखू
‘काढनं न गा तंबाखूफंबाखू’.आपल्या वऱ्हाडातला हा नेहमीचा वाक्प्रयोग आहे.तंबाखू खाणे आपला सर्वांचा आवडता शौक आहे.तंबाखू खाल्याने कर्करोग होवू शकतो हे माहित असूनही तंबाखू राजरोसपणे खाल्ल्या जातो.पण ‘फंबाखू’ कोणाचा आवडता आहे काय?पण तो आपण तंबाखूसोबत टाकतोच ना तोंडात.कां तंबाखूसोबत ‘फंबाखू’ खाल्ल्याने कर्करोग होत नाही.

‘खांडमांड’,’दारुगिरु’ ह्या शब्दांचेही तसेच आहे.मी वर लिहिल्याप्रमाणे’लावालावी’ बद्दल तर सांगावयासच नको.असे बरेचसे शब्द आहेत ज्यांचा त्यांचेसोबत असलेल्या दुय्यम चमचा शब्दाचा काहीही अर्थबोध होत नाही.मराठी व्याकरणात याला ‘अभ्यस्त’ (म्हणजे ‘पाव्हणागिव्हणा’ असावा)असं गोंडस नाव दिलेलं आहे.असो,या निमित्ताने आपल्याशी थोड्या ‘गप्पाटप्पा’ झाल्यात हेही नसे थोडके.आता यातील ‘टप्पा’ ओळखून आपण पुढील वाटचाल करु या.
-आबासाहेब कडू
९५११८४५८३७