स्मशानभूमीची स्वच्छता करत राष्ट्रसंतांना अनोखी मानवंदना
* भाजपा युवा मोर्चाचे आयोजन
* येवदा येथे विविध उपक्रम
गौरव प्रकाशन
दर्यापूर(प्रतिनिधी) : तुझं गावचं नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या युक्तीप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अनोखी मानवंदना अर्पण केली. राज्यसभेचे खासदार तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर काम करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे यांच्या सूचनेप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य पंकज कान्हेरकर, ऋतिक गावंडे, प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश इंगळे आदींनी पुढाकार घेत स्थानिक हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना या माध्यमातून अभिवादनही करण्यात आले. सतीश टोलमारे, योगेश हरसुले, सुमित देव्हारे, मनोज चव्हाण, आशिष चव्हाण, शुभम देव्हारे, युवराज मेश्राम, आदित्य इखे,प्रज्वल गावंडे,पूर्वेस कदम, यशोदिप गावंडे,यज्ञेश्वर भांडे,नवतेज रघुवंशी,विकास गुप्ता,ज्ञानपाल राऊत,राम अग्रहरी,ओम गव्हाणे या तरुणांनी या अभियानात सहभाग घेतला. आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, माजी आमदार रमेश बुंदिले, भाजपा विधानसभा प्रमुख गोपाल चंदन, मंडळ अध्यक्ष मदन पाटील बायस्कार,जिल्हा सचिव किरणताई देशमुख माजी गटशिक्षणाधिकारी संजय वाघमारे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मालाताई डोईफोडे,ओमप्रकाश शर्मा,रामदासजी कराळे, युवा मोर्चा सचिव अभिजित मावळे यांच्या सहकार्यातून तरुणाने हे अभियान राबविले.