टाकळीत कोज्यागीरीच्या चांदण्यात काव्यसंध्या फुलली
गौरव प्रकाशन
पारनेर (प्रतिनिधी) : स्थानिक पारनेर साहित्य साधना मंच, पारनेर जि अहमदनगर आणि हॉटेल लक्ष्मी, टाकळी ढोकेश्वर , जि अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २८.१०.२०२३ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत टाकळी ढोकेश्वर येथील हॉटेल लक्ष्मी येथे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने काव्य कोजागिरी या काव्यसंमेलनाचा सोहळा साजरा करण्यात आला.
अतिशय नेटके नियोजन, हॉटेलचे संचालक चांद शेख सरांनी केलेली व्यवस्था, मा जेष्ठ साहित्यिक संजय पठाडे सरांनी पारनेर साहित्य साधना मंच समुहाच्या वतीने केलेल्या सत्काराची तयारी, बोर्ड, हे सर्व प्रेरणादायी होते.
प्रा विजय लोंढे सर, रामदास पुजारी सर, कवी प्रशांत वाघ, मा बाबर सर, विजू भाऊ रोहकले, गीतांजली वाबळे मॅडम, योगिता भिटे मॅडम, सुजाता रासकर मॅडम, सुवर्णलता गायकवाड मॅडम, चाबुकस्वार सर, स्वाती ठुबे मॅडम, दैनिक सह्याद्रीचे संपादक शिर्के सर, गायके दादा, पारनेरचे अशोकराव गायकवाड, विनोद काका गोळे, साहेबराव घुले सर, युवा कवी संकेत ठाणगे , संदीपजी राठोड, डॉ बाळासाहेब शिंगोटे, डॉ प्रविण जाधव , प्रा आगळे नाना, वाळूंज सर आणि वाळूंज मॅडम व परिवार, स्वीटी ताई, मा सतिशजी शेटेसर, मा कानिफनाथ गायकवाड सर आदींनी आपल्या रचना सादर केल्या
मा देवादादा ओहोळ यांची सुत्रसंचालनाची फटकेबाजी आणि पठाडे सरांच्या गझला कायम लक्षात राहिल्या…
चांद शेख यांच्या परिवारातील सदस्यांनी घेतलेली मेहनत या काव्य कोजागिरीचा आत्मा होती हे त्रिकालाबाधित सत्य ठरले. फोटोग्राफी करणारे झावरे दादा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या आणि मनतृप्त आस्वाद घेतलेल्या मासवडीचे जेवणाची लज्जत या कार्यक्रमात काही औरच होती….
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आटवलेल्या दुधाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे…मा शिर्के सरांनी केलेली स्तुती आणि पुढील वर्षाच्या काव्यकोजागिरीसाठी दिलेले आमंत्रण हे पारनेर साहित्य साधना मंच समुहाचे एक पाऊल पुढे असल्याचे द्योतक ठरले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी बहारदार रचना सादर केल्या.