स्त्रीवादी हुंकाराचा चिंतनात्मक आलेख : अनुराधा पाटील यांच्या कवितेचे स्त्रीवादी-आकलन
आपण दिलेला अनुराधा पाटील यांच्या कवितेचे स्त्रीवादी -आकलन हा संशोधनात्मक ग्रंथ नुकताच वाचण्यात आला. या संशोधनामधून अनुराधा पाटील यांच्या कवितेतील अस्सलता प्रभावीपणे रेखाटल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत..
भारतीय स्त्री हे पात्र अत्यंत क्रांतिकारक आहे. पण काही समाज घटकांनी या पात्रांना गुलाम करून ठेवलं होतं. स्त्रीचे अस्तित्व नष्ट केलं होतं. स्त्रीचे पंख छाटले होते .पण भारतीय संविधानाने स्त्रीला मोकळे आकाश निर्माण करून दिले. या मोकळ्या आकाशातून आज ती मनसोक्त विहार करत आहे .अशा मनसोक्त आकाशात विहार करणारी कवियत्री अनुराधा पाटील अत्यंत भावनाप्रधान आहे.
त्यांच्या कवितेतील स्त्री जाणिवांचा आलेख अत्यंत वास्तवगर्भी व चिंतनात्मक ,सुक्ष्मतासुक्ष्म यांच्या वेध घेणारी आहे .सप्न आणि वास्तववादी मनोजाणिवाचा बोध प्रकट झालेला दिसतो .दिगंत आणि इतर कवितासंग्रहातील त्यांची
भावव्याकुळता ,प्रेमजाणिवा ,स्त्री स्वातंत्र्य, ममत्म ,बंधुत्व ,वेदना त्याचे अनोखे आशयगर्भी विश्लेषण त्यांच्या कवितेतून साकार झालेले आहे. पण अनुराधा पाटील यांच्या कवितेतील मनोवेधनेचा तळ पुरानमूल्यांचा नकार देणारा नाही. दु:खाने घायाळ झालेला मनाला पेटवण्याची जिद्द त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे दिसून आलेली नाही. त्यांची कविता स्त्रीवादी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी असली तरी आजच्या स्त्रीवादी स्वातंत्र्याचे संविधानात्मक मूल्य स्वीकारत नाहीत.
आपल्या संशोधनवृत्तीतून त्यांच्या कवितेतील वास्तवगर्भ चिंतन मांडले आहे .वेगवेगळ्या प्रकरणांमधून त्यांच्या भावआशयशीलतेचे मनोविश्लेषणात्मक पद्धतीचे आकलन वाचकाला करून दिलेले आहे. आपल्या संशोधन वृत्तीने अनुराधा पाटील यांच्या कवितेतील वास्तव चिंतन अधोरेखित केलेले आहे. त्यांच्या कवितेच्या हृदयात शिरून अचूक वेध घेण्याची तुमची शैली अत्यंत परिवर्तनवादी आहे. आपण अशाच प्रकारचे लेखन पुढे करत राहावे .हीच माझ्याकडून आपणास मंगलकामना…!!
-संदीप गायकवाड,
नागपूर
९६३७३६७४००