📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीत धक्कादायक फसवणूक! ‘बँक अधिकारी’ बनून 70 वर्षीय शेतकऱ्याची 8 एकर शेती हडप

On: June 29, 2026 1:06 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावतीमध्ये बँक अधिकारी बनून वृद्ध शेतकऱ्याची 8 एकर शेती हडप प्रकरण

अमरावती प्रतिनिधी: जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे भासवून काही भामट्यांनी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची तब्बल 8 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणोरी येथील रहिवासी नंदकिशोर रामप्रसाद शर्मा यांना घराची पुनर्बांधणी करायची होती. त्यासाठी शेती मॉर्गेज ठेवून बँकेतून कर्ज घेण्याचा त्यांचा विचार होता. याच दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने काही “बँकेचे दलाल” ओळखीचे असल्याचे सांगत त्यांची आरोपींसोबत भेट घडवून आणली.

आरोपींनी स्वतःला बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगून वृद्ध शेतकऱ्याचा विश्वास जिंकला. शेती मॉर्गेजसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागतील, असे सांगत त्यांनी शर्मा यांच्याकडून महत्त्वाचे दस्तावेज घेतले.
शर्मा हे अशिक्षित असल्याचा फायदा घेत आरोपींनी मॉर्गेजचे कागद तयार करण्याऐवजी थेट त्यांच्या मालकीची गणोरी आणि शिपगाव येथील सुमारे 8 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. एवढेच नाही तर खोटी इसारचिठ्ठी आणि बनावट खरेदीखत तयार करून संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा आरोप आहे.

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर नंदकिशोर शर्मा यांनी भातकुली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी अशोक राधेश्याम जोशी, श्रीनिवास राजेंद्र जोशी, सारासिंह मनोहरसिंह चव्हाण, वराह राजेंद्र जोशी, संतोष मिश्रा आणि अनिल चौधरी या सहा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासून घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा