
ह्यांच्यामुळे …
देवा तुझे किती
सुंदर आकाश
झोपड्या भकास
पृथ्वीवर….
येशू तूझा किती
दयाळू प्रकाश
प्राण्यांचा आक्रोश
उत्सवाला ….
खुदा तुझी दुनिया
आबादी आबाद
माणूस बरबाद
फक्त येथे …..
बुद्धा तुझी कुठे
अहिंसा अहिंसा
युद्धाची मीमांसा
कोण करी …..
धर्म ग्रंथ सारे
ठेउनी खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ……
देव , धर्म आणि
सारेच प्रेषित
विश्व प्रदूषित
ह्यांच्यामुळे …

-अशोक थोरात
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!