
माणूस तोडत चाललेली गावं…
मी बघतोय दिवसेंदिवस
जातिय सलोखा हरवत
चाललेली गावं….
नात्यापासून नाती तोडत
चाललेली गावं…
राक्षसी विचारांनी पक्ष बांधनी करत..
माणसापासून माणूस तोडत
चाललेली गावं….
रस्ते,डांबरीकरण,मंदिर,भवन पुल,नाले दुरूस्तीलाच विकास समजून भुरळ पडलेली गावं…
पण विचार शक्ती बंद पडून मेंदू चा भुगा करून घेतलेली
जाती अहंकाराने बरटलेली गावं….!
अजूनही निर्धन, निराधारांच्या निर्धनाच्या वस्तीवर चालून
जाणारी गावं…
अजूनही महामानवांची अपमान करणारी बिनडोक बनत चाललेली गावं…..
स्वार्थीसाठी कुणा आडमुठालाही
पुन्हा पुन्हा सरपंच करणारी गावं…
भावा भावा लाव्या दुव्या करुन
राजकारण खेळणारी गावं…
प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ही काहीच न त्यास कळणारी गांवं…
विचाराने शेंबड्याच्या मागेच शेवटी वळणारी गावं…
आपल्या सोबत इतरांनाही
पाच वर्षे हिटलरशाहीच्या दावणीला बांधणारी गावं…
मंदिर-मजिद सारखा सारखा भेदभाव पेरणारी गावं…..
समतेचा मुखवटा घालून विषमतेलाच खतपाणी घालणारी गावं……
आपल्या वर्चस्वासाठी दुसऱ्यांचं
अस्तित्व मिटवायला चाललेली गावं…..
प्रतिगामी विचाराला कवटाळून भंडारा ऊधळणारी गावं…
माणसाला पाणवठ्यावर पाणी न
भरू देणारी गावं….
नुसताच तुकोबा-विठोबा,चोखोबा टाळ म्रुदुंगातून सांगत भोंग्यातून ओरडणारी गावं…
मी बघतोय दिवसेंदिवस माणुसकी लोप पावत चाललेली गावं…
राजकारणाने आतून खाललेली गावं….
कधी दिसणारच नाहीत का राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील सुजलाम सुफलाम गावं…?
कुठे गेलीत–
गाडगेबाबांच्या किर्तनातली
डोक्याने सुपिक झालेली गावं….?
कितीक दिवस बघणार आणखी
रस्ते,पाणी, नाल्या घरे,घरकुले सर्वकाही टकाटक्…
पण विचाराने सडलेल्या मेंदूच्या
माणसांची गावं….?
किती दिवस बघणार..
किती दिवस बघणार…?

-नंदू वानखडे
मुंगळा ता.मालेगांव जि.वाशिम
९४२३६५०४६८