• Sun. Jun 11th, 2023

सबका प्रयास सबका कर्त्यव्य च्या माध्यमातून अमरावती शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित निर्माण होईल. – खा. डॉ. अनिल बोंडे

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ९३ व्या मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपन अमरावती महानगरपालिकेने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित केले होते. या ‘मन की बात’ च्या प्रक्षेपणा नंतर स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले यांच्या सत्कार करून त्यांना ओळखपत्रे देण्याचा कार्यक्रम पार पडला, स्वच्छता कर्मी, फेरीवाले यांच्यासह महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीं नी सांगितल्याप्रमाणे ‘सबका प्रयास सबका कर्तव्य’ या माध्यमातून अमरावती शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित निर्माण होईल असा विश्वास खा. डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे उपस्थित होते.

  मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या सूचनेनुसार अमरावती महानगरपालिकेने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित केले होते. या कार्यक्रमामध्ये शहरातील मान्यवर व्यक्तींसोबत शहरातील स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले यांना निमंत्रित केले होते. या सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या माधमातून होणार असल्यामुळे मोठी उत्सुकता अमरावती शहरामध्ये निर्माण झाली होती. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात मध्ये चित्त्यापासून ते दिव्यांगा पर्यंत सर्व अंगांना स्पर्श केला आणि सर्वश्रेष्ठ भारत निर्माण करण्याकरिता सर्व भारतातील लोकांचा सहभाग आवश्यक असतो हे सुद्धा या मन की बात या कार्यक्रमातून प्रतीत करण्यात आले. स्वच्छ आणि सुरक्षित सागर किनाराच्या माध्यमातून युवकाचा स्वच्छतेकरिता असलेला सहभाग सुद्धा ‘मन की बात’ कार्यक्रमामधून दाखविण्यात आला. या ‘मन की बात’ च्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून अमरावती शहरातील स्वच्छता कर्मचारी व फेरीवाले यांना प्रेरित करावे हा उद्देश या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमाच्या आयोजना मागे होता.

  ‘मन की बात’ चा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पंडित दिनदयाल उपाध्याय ज्यांनी अंतोदय व एकात्म मानवतावादाचा विचार मांडला त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरु करण्यात आले.

  आयुक्त डॉ. प्रवीणजी आष्टीकर यांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी केलेल्या पी.एम. स्वनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना १०००० रुपयांचे व २०००० रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे सांगितले. कोविड नंतर या फेरीवाल्यांना आपला उदरनिर्वाह करणाचा पी.एम. स्वनिधी माध्यमातून अतिशय मोठी मदत झाली असे प्रामुख्याने विशद केले. स्वच्छता कर्मिच्या माध्यमातूनच आम्ही शहराचा विकास करू असा संकल्प त्यांनी केला. भारतामध्ये पहिल्यांदाच एखाद्या महानगरपालिकेला आदरणीय पंतप्रधान यांच्या “मन की बात” कार्यक्रमांमध्ये समाविष्ट होण्याचा आपल्याला मान मिळालाय आणि तो मान अमरावती महानगरपालिकेला खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्‍यामुळे मिळाला आहे. मी सर्वप्रथम त्यांचं अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आणि अमरावती सर्व अमरावतीकर यांच्या वतीने त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार मानतो. राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानामध्ये अमरावती महानगरपालिका मार्फत चांगल्या पद्धतीने काम होत आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, जननी सुरक्षा योजना आणि एक देश एक राशन कार्ड योजना आहे. १७० लाभार्थ्यांची पथविक्रेत्यांच्या कुटुंबांना याही योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे.

  विभागीय आयुक्‍त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले की, आष्टीकर साहेबांचा आणि सर्वच महानगरपालिकेचे पदाधिकारी यांचे अभिनंदन त्‍यामुळे नागरिकांना चांगल्या कार्यक्रमांमध्ये लाईव्ह सहभागी होण्याचा योग लाभलेला आहे. आदरणीय पंतप्रधानांनी अनेक विषयांना भाषणामध्ये स्पर्श केलेला आहे. अक्षरशः थबकुन गेलो की, दिव्यांग मुलगी सुद्धा अशा प्रकारे योगामध्ये तज्ञ होऊ शकते. तेव्हा अनेक विषयांना तरी स्पर्श केलेले मी आष्‍टीकर साहेबांना आणखी धन्यवाद देतो की, त्यांनी केवळ याचा प्रक्षेपण ठेवला नाही त्याच्या निमित्ताने जोडून चांगल्या कार्यक्रम अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.

  आमदार प्रविण पोटे पाटील यांनी सांगितले की, सर्वप्रथम पंडित दिनदयाळ उपाध्‍याय यांना अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम महानगरपालिकेला घेतला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आज आपण या ठिकाणी मन की बात च्या अनुषंगाने आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या या जयंती निमित्त आपण एक चांगला उपक्रम घेतला. हॉकर्सला ओळखपत्र देण्याचे काम या ठिकाणी आपण केले आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांनी भारत देशाची महत्त्वाची भूमिका या जगामध्ये आहे हे दाखवून दिलं त्याचप्रमाणे आपलं आपल्या अमरावती सुद्धा ठिकाणी आपण एक महत्त्वाची भूमिका आपली दाखवली पाहिजे. महानगरपालिका ज्याप्रमाणे आपण सगळ्यांना सुख शांती देण्याचा काम करते. त्याचप्रमाणे त्या महानगरपालिकेमध्ये एक चांगले चैतन्याचा वातावरण निर्माण केला पाहिजे.

  खासदार सौ.नवनीत राणा यांनी सांगितले की, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की अमरावती महानगरपालिकेला या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले. महानगरपालिकेने हॉकर्स झोन बनवून हॉकर्सला त्‍याचा व्‍यवसाय करण्‍याची संधी उपलब्‍ध करुन द्यावी. येणारे दिवस हे सनासुदीचे असून हॉकर्स तसेच लहान व्‍यवसायीक यांना त्रास होणार नाही त्‍याची काळजी घ्‍यावी. महिला बचत गटांना त्‍यांचे साहित्‍य विकण्‍यासाठी हक्‍काची बाजारपेठ उपलब्‍ध करुन द्यावी. अमरावती सौंदर्यीकरणासाठी अनेक युवकांनी पुढाकार घेतला होता. अमरावती शहराला स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. अमरावती शहराचे नाव मोठे झाले असून केंद्र शासन व राज्‍य शासन योग्‍य ते सहकार्य करीत आहे. लोकांचे प्रश्‍न घेवून आम्‍ही कार्य करत असतो. महानगरपालिका हा आमचा परिवार असून यांच्‍या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला जाईल.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून लाभलेले खा. डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या उद्बोधनामध्ये अमरावती शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित बनविण्याचा संकल्प करू. ज्याप्रमाणे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सबका साथ सबका विकास सबका विश्वास त्याचप्रमाणे सबका प्रयास व सबका कर्तव्य हे सांगतात. त्यामध्ये प्रयास व कर्तव्याचे जाणीव ठेवून आपण सर्व कर्मचारी व अमरावती शहर स्वच्छ व सुंदर सुरक्षित व्हावे यासाठी आपण आटोक्यात प्रयत्न करू असे आव्हाहन करू त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या कामामध्ये युवकांचा सुद्धा सहभागाचे महत्व सुद्धा त्यांनी विषद केले.

  मन की बात या कार्यक्रमात भाजपा शहर अध्‍यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर चेतन गावंडे, माजी पक्षनेता तुषार भारतीय, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, पारिचारीका, कार्यकर्ते तसेच नागरी‍क मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *