- गोवर्धन पुरी । सूर्य उगवला ।
- माघ पौर्णिमेला । रवि जन्म॥१॥
- रघुराम पिता । रघुराणी माता।
- सुसंस्कार दाता । मातापिता ॥२॥
- गुरू रविदास। कर्मातून संत।
- वादविवादात। यशप्राप्त॥३॥
- स्वयंप्रकाशित । व्हावे बहुजन।
- उच्च तत्त्वज्ञान। रविदास॥४॥
- जात ना अनेक । एक आहे जात।
- नाव या जगात । मानवता॥५॥
- मिराबाईचे ते। ‘गुरू ‘रविदास
- अभंग रैदास। गायनात॥६॥
- संत एकनाथ । श्री गुरुनानक ।
- संत प्रशंसक । रविदास॥७॥
- मानवतावादी। गुरुंना नमन।
- करांनी वंदन। कोटी कोटी॥८॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर,अमरावती
- भ्र.ध्व.:- ८०८७७४८६०९