- आज गोवत्स बारस
- माय लेकराचा खास
- गाय वासरु पूजा रे
- दिवाळी पहिला दिस !!
- भक्त देवा परी शुद्ध
- माय लेकराचे प्रेम
- नसे कशाची आसक्ति
- फक्त आंतरिक प्रेम !!
- माझ्या गोमातेचा पान्हा
- त्यास अमृताची गोडी
- शेती साठी जन्म देई
- सर्जा राजाची र जोडी !!
- गोमाता कामधेनु
- बहुगुण तिच्या पोटी
- नांदती देव तेथे
- कोटि कोटि सुखासाठी !!
- पाय धुवा पूजा करा
- ऋणातुन उतराई
- मुखी घालुनिया घास
- करू साजरी डीवाई !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला
- 9923488556
—–
(Images Credit : Latest ly)
Contents hide