• Wed. Jun 7th, 2023

एकाचे कर्म, दुसर्‍याचे भविष्य

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याची समांतर ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या वेब सीरिजचे खिळवून ठेवणारे कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या वेब सीरिजच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसर्‍या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या सीरिजचा दुसरा सिझन १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
समांतर सीरिजच्या सिझन १ चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणार्‍या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सिझन २ मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही त्या स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का? याचा शोध १0 भागांच्या सीरिजमध्ये आहे.
समांतर २ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १0 भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. समांतर २ बद्दल स्वप्नील जोशी म्हणतो, प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन समांतरने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शोने आपलंस केलंय. समांतरचा पहिला सिझन येऊन आता वर्ष उलटले असून मला माहित आहे की, प्रेक्षक आता सिझन २ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सिझन २ मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यातही प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *