- मरणाच्या दिशेकडे
- पाय जातात आपले ।
- मोजा बरं आयुष्यात
- किती बोकडं कापले? ।।
- आहे कोणत्या धर्मात
- मांस खाणे पुण्य आहे? ।
- पर जातीय प्राण्यांना
- अधिकार शुन्य आहे? ।।
- रक्त प्राशणारे कधी
- योग्य करतील कर्म? ।
- काय अशांना कळेल
- कधीतरी सत्य धर्म? ।।
- मांस नाही खाल्ले तर
- वाढणार म्हणे प्राणी ।
- मानवांच्या जीवनाची
- होणारही म्हणे हानी ।।
- सांगा माणसा एवढे
- आहे कोण क्रुर बरे? ।
- नांदू देतो इतरांना
- कधीतरी सौख्यभरे? ।।
- आहे संतांची जमीन
- नका करू हिंसाचार ।
- नका देऊ दगडांना
- कधी रुधिराची धार ।।
- भूतदया जागवूया
- सगळ्यांच्या हृदयात ।
- सद्भावाने राहूनच
- मन गुंतवू कामात ।।
- शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७