कॅलरीविषयी सजग असणार्यांना लग्नसराईचे हे दिवस काळजीचे वाटतात. लग्नसमारंभांमध्ये, पाटर्य़ांमध्ये जास्त खाणं होत असल्यामुळे डाएटची चिंता सतावणं स्वाभाविक आहे. पण यावरही मार्ग काढता येतो.
पार्टीला जाण्याआधी थोडंस खा. उपाशी राहिल्यास तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाल. ताटात एकदम वाढून घ्या. बुफे टेबलपासून लांबच रहा. यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जाईल. तळकट, मसालेदार, गोड, क्रिम असणारे पदार्थ टाळा. एकदा खाणं झाल्यावर पुन्हा घ्यायच्या आधी २0 मिनिटं थांबा. पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी २0 मिनिटं लागतात. मिठाई किंवा अन्य गोड पदार्थ इतरांसोबत शेअर करा. घरी गोड करायचं असेल तर लो फॅट दूध तसंच कमी कॅलरीवाले दुधाचे पदार्थ वापरा. साखरेऐवजी गूळ, मध, फळं, सुका मेवा यांचा वापर करा. दुपारी जास्त खाल्लं असेल तर रात्री साधं आणि कमी जेवा. सॅलड, सूप, उकडलेल्या भाज्या, कोशिंबरी, डाळ, साधा भात असा हलका आहार निवडू शकता.
डाएटची चिंता सतावते?
Contents hide