पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पुण्यातील एका केंद्रावर एका विद्यार्थ्याने पीपीई किट घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली आहे.
पीपीई किट घालून ‘त्याने’ दिली एमपीएससीची परीक्षापुण्यात ७७ परीक्षा केंद्रावर झाली परीक्षा राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या छायेखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात १८00 परीक्षा केंद्रावर एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. एकूण २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयोगाने जाहीर केलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा दिली.
ज्या उमेदवारांना कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्यास, त्यांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याला एकट्यालाच बसविण्यात आले होते.
दोन पेपर होते. पहिल्या पेपर नंतर मध्यन्तरी १ ते दिड तास विद्यार्थ्यांना बाहेर सोडून पुन्हा केंद्रावर परीक्षेसाठी सोडण्यात आले. मात्र, या विद्यार्थ्याला लक्षणे असल्याने त्याला दोन्ही पेपरला एका रूममधेच बसविण्यात आले.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता होणार्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या आधी ज्या ज्या केंद्रावर परीक्षा होणार आहे त्या-त्या केंद्रावर सॅनिटायझर करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनाही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापड्याचा (मास्क) परिधान करणे अनिवार्य करण्यात आला होता. तसेच परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा वापर करणे उमेदवारांना अनिवार्य होते.
Related Stories
April 26, 2024