धामणगांव रेल्वे : कोरोनाच्या विषाणू पासुन कायम ची मुक्ती मिळावी यासाठी लस शोधण्यास यश मिळाले . आता त्या लसिकरणाची मोहिम संपुर्ण जिल्यात सुरु होऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही लसीकरणाचे टीके लावण्याची सुरुवात होऊन मागील तीन दीसात शहरामध्ये जवळपास २00 ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्ष भरा पासुन देशपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.कोरोना रोखण्यासाठी लस कधी येईल याची प्रतिक्षा सर्वसामान्याना होती आखेर तज्ञाना यश मिळवून आता संपुर्ण देशात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहेत्याच अनुषंघाने जिल्ह्यासहित तालुक्या व ग्रामीण स्तरवरही ही मोहिम सुरु झाली असुन पहील्या टप्प्यात फ्रन्टलाईन व हेल्थकेयर व आरोग्य कर्मचार्यांना लस टोचण्यात आली. त्या नंतर दुसर्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.त्या निमित्ताने १ मार्च ते ३ मार्च पयर्ंत धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात २00 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तर या आधी हेल्थकेअर वर्कर व या क्षेत्रात सेवा देणार्या कर्मचार्यांनाचे लसीकरण करण्यात आले होते असे एकुण आता पयर्ंत ग्रामीण रुग्णालयात एकुण १0७५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकणचे टीके लावण्यात आल्याची माहीती तालुका अधिकारी हर्षल क्षिरसागर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश साबळे यांनी दीली.
Related Stories
April 26, 2024