- टोकर टोकर करून
- तुह्य पोटभर पेन
- लसन कांदया संग
- खळे मिठाचे खान !!
- टोकर टोकर पेत होता
- गच्च डोये लाऊन
- आज डोये नाहीत फाकत
- समोर बंफर पाहुन !!
- घोटभर घेता घेता
- कसा पव्यावर गेला
- चांगला चांगला म्हणता
- तू बेवड़ा कसा झाला !!
- देशी गटागटा पेत
- नाक पक्क दाबुन
- हाती काही नाही उरत
- गड्या राब राब राबुन !!
- पेत संत्रा बॉबी ट्यांगो
- तोंड करून तू हेकोळ
- टोकर टोकर दारूपाई
- झाल संसाराच वाटोळ !!
- म्हणून म्हणतो गड्या
- तू सोड हा खुळा नाद
- लेकरं,बाईल संग
- संसारी सुखानं नांद !!
- -वासुदेव महादेवराव खोपड़े
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556