लाडकी बहिण.!
निवडणूक आली तसे नेते
मस्त गाणे लागतात गाऊ
जिला कधीही बघितले पण नाही
ती लाडकी बहीण होते अन तो लाडका भाऊ?
विसरल्या बाया मग, खोकला अन सर्दी
प्रत्येक ब्यांकेत विचारूनका, जत्रे सारखी गर्दी
आधारकार्ड रेशन कारडाचा कडक होता कायदा
मग अडानी बायांचा दलालांनी
चांगलाच घेतला फायदा
राजकारण्याच्या खिशातून काय गेले?
हा खेळ त्यांचा आवडता
बहीण तेव्हढी लाडाची..
मग जावाई काय नावडता??
अरे, असे अबजो करोडो वाटण्या परिस, वीज कराना स्वस्त!
पेट्रोल डिझल डाळ धान्य घेताना
बिचारा सामान्य,
झाला बिलकुल त्रस्त!!
खुर्ची साठी सर्वच फुकट वाटा.. द्या धान्य कपडे अन बिनव्याजी लोन
सगळंच आयते भेटल्यावर सांगा..
महाराष्ट्रात कष्ट करील कोण???
– माधुरी चौधरी वाघुळदे
छ.संभाजीनगर
9421860873