- हे
- बुध्दा तुझ्या
- कारूण्यमयते पुढे सारे जग
- झुकले अन तू आकाशापरी
- निसर्गाच्या चक्रासारखा
- कार्यकारण भाव शोधला
- अन त्या कारणामुळे कळले
- जन्म मृत्यू चे कारण
- कारणातून कारण दुःखाचे शोधले.आणि दिला माणसाला
- अष्टांगिक मार्ग निर्वानाकडे
- घेऊन जाण्याचा
- तरी ही लोक कारणांमुळे बेकारण होतात अन अकारण दुःखी होतात
- ते जाणत नाहीत मन चित्ताला ते पाहत नाहीत तृष्णेला
- ते अधिकच तृष्णेच्या मागे लागतात
- अन भवपार न होता अहंकार स्वार्थ आळस घेऊन विक्राळ वादळासारखे हसतात तेव्हा
- तु शांत बघत असतो त्यांच्याकडे
- कोठून आणलीस ही भव्यता सौम्यता…शितलता चंद्रासारखी प्रकाशमयता!!
- प्रयोगशाळेतुन
- मांडलेले
- चार आर्य सत्ये अन तुझी विपश्यना जगाने अंगीकारली अन
- संपूर्ण तुझ्या प्रज्ञानाला दुःखमुक्तीचा निसर्गाने दिलेला किताब हा सर्वश्रेष्ठ आहे हे अभया
- अंजिठ्याच्या लेण्याबघून
- मी तुजपुढे नम्र होऊन गातो..
- गीत माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हे माणुसकीचे गीत गाजत आहे चोहीकडे संविधानातून
- -सुनिता इंगळे
- मुर्तीजापुर
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Contents
hide
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–