- गाव वसविला चिमण्यांनी
- या झाडाच्या फांदीवर
- खोपा झुलतो आकाशी
- जीव टांगूनी वा-यावर
- कुण्या शहरी विद्यापिठाच्या
- ह्या विद्यार्थीनी इंजिनीयर
- एकेका काडीने विणती खोपा
- कुणी शिकविली कलाकुसर
- ना जात, देश,धर्माचे बंधन
- एकोप्याने करीती विहार
- गगनाला घालती गवसनी
- आदर्श घ्यावा असा संस्कार
- ऊन्हे असो वा पावसाळा
- वादळात भासती दीपस्तंभ
- उघड्यावरचे जीणे तयांचे
- निसर्गच असे आधारस्तंभ
- समता, स्वातंत्र्य नि बंधुता
- न्यायाने वागती एकमेकांशी
- ना भांडण-तंटा ,हानामारी
- ना सोयर सुतक कशाशी
- ना संपत्ती ना संचय भाकरीचा
- मानवासम माया पिल्लावरी
- संरक्षण करीती स्वतः स्वताचे
- प्रयत्नांती घेती गगनभरारी
- -अरुण विघ्ने