- श्रावण मासी, न हर्ष मनासी
- कुठे कुठेच, हिरवळ दिसे !
- धो धो पाऊस,ढग फुटी होई
- सारेच रान, पाण्यात वसे !!
- सर सर शिरवा, रिमझिम नाही
- थेंब मोत्यांचे, श्रावण सर !
- धो धो पाऊस, पडे सारखा
- नभ कोसळे, धरणी वर !!
- काळे सावळे, मेघ नभि
- ना नाचे मोर, हिरव्या रानी !
- नाग वारुळी, पूजना साठी
- नाही दिसल्या, सख्या सजणी !!
- तरु शिखरांवर, उंच घरांवर
- सदा सर्वदा, अंधार दिसे !
- चंद्र तारे, नभी दिसेनात
- सूर्यदेव कैसा, लपून बसे !!
- रव मंजुळ, किलबिल नाही
- नसे मंदिरी, टाळांची किणकिण !
- सृष्टी अतिवृष्टीने,स्वर हरवले
- झाले सजीव, सारेच भिनभिन !!
- असा कसा हा, श्रावण देवा
- आबाल वृद्ध, सारेच वेडेपिसे !
- श्रावण मासी, न हर्ष मनासी
- कुठे कुठेच, हिरवळ दिसे !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
- अकोला 9923488556
- (Images Credit : Lokmat)