- देवाला शोधण्या, जातो मंदिरात
- मैल हा मनात, घेऊनिया
- सांग ना माणसा , दिसेल का देव
- नसतांना भाव, हृदयात?
- बनुनी निःस्वार्थी, कर्म सदा कर
- पावेल ईश्वर, नित्य तुला
- मन शुद्ध ठेव, मूर्ख ठरू नको
- घात करू नको, कोणाचाही
- दुसऱ्यांना सुखी , नित्यची ठेवावे
- मानवा मानावे, हरिहर
- तुझ्याच कर्माचे, तुला मिळे फळ
- सत्यासाठी लढ, उठ जरा
- सेवा जननीची, तुझ्याच रे हाती
- सत्याची ही ज्योती, पेटवण्या
- दिसे माणसात, तेव्हा तुला देव
- शुद्ध अंतर्भाव, तुझे असो
- बघण्या ईश्वर , शोध माणसात
- नको दगडात , त्याला शोधू
- -प्रतीक्षा गजानन मांडवकर
- पिंपळगाव यवतमाळ
- ८३०८६८४८६५