- शुष्क थेबांचा आकांत
- वेशी नदीलाही पूर
- गाव नदीच्या किनारी
- एक अनामिक हुरहूर
- उभे एकटे सनातन
- गाव वेशीला देऊळ
- क्षण भंगुर क्षणांचे
- इथे उध्वस्त राऊळ
- शेत शिवारी दिशांना
- गाव डुबलेला खोल
- स्वप्न उध्वस्त उद्याचे
- रूते काळजाला ओल
- वारा अनाम दिशांचा
- पुन्हा वादळाची भिती
- कुणा कळलीना कधी
- इथे निसर्गाची निती
- कुणी ठरूनये इथे
- त्याच्या प्राक्तनाचा बळी
- वेधशाळेचा अंदाज
- नित्य चुकलेला गळी
- त्याचे स्वप्न केवीलवाणे
- दिर्घ संर्घष उरात
- गेली वाहुनी सगळी
- गाव नदीच्या पुरात
- -प्रमोद पंत
- 9763015600