लग्नसराईच्या या काळात सुंदर कपडे घालून मिरवावं असं प्रत्येकालाच वाटतं. चला तर मग, लग्नाशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमात वेगळेपण जपायचं असेल तर काय करायला हवं ते पाहू या.
साखरपुड्याला फॉर्मल सूट कॅरी करा. काळा ब्लेझर, काळा/पांढरा शर्ट आणि मिळताजुळता टाय असा पेहराव करा. त्यावर काळे बूट घाला. सेमी फॉर्मल लूकसाठी व्हाईट स्नीकर्स घालता येतील. हळदी समारंभाला साधा कुर्ता पायजमा घालता येईल. वेगळ्या लूकसाठी पठाणी कुर्ता-पायजमा घालता येईल. संगीत सोहळ्यात पूर्णपणे पारंपरिक पेहराव करा. गडद रंगाचा कुर्ता, त्याला साजेसं नेहरू ज्ॉकेट आणि पायजमा खूप छान दिसेल. मरून रंगाचा कुर्ता उठून दिसतो. मोजडी किंवा कोल्हापुरीने हा लूक खुलवा. मुख्य विवाह सोहळ्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर पारंपरिक पेहराव करू शकता किंवा सुटाबुटात मिरवू शकता. स्वागत समारंभ असेल तर लग्नप्रसंगी पारंपरिक पेहराव करता येईल. शेरवानी विकत घ्या. क्रिम, मरून किंवा ऑफ व्हाईटला प्राधान्य द्या. आधुनिक डिझाइन्स तसंच मळकट रंगाना फाटा द्या.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023