- बुध्द पुष्प
मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प अपरिमित वर्षानंतर एकदाच जन्माला येते पण जेव्हा उमलते तेव्हा या संपूर्ण जगाला प्रज्ञा,आणि करूणेचा मधुर रस देऊन जाते.धम्मचक्र परीवर्तन बुध्दाने केले भुतो न भविष्य असे तत्त्वज्ञान या सृष्टीतील सम्यक ज्ञान जगाला दिले तो दिवस म्हणजे धम्म चक्रपरिवर्तन म्हणून प्रसिद्ध पावला ..माणसाने माणसासोबत माणुसकीने वागावे हाच बुध्द जीवनाचा पाया आहे.जगाला बुध्दाच्या विचाराची अत्यंत गरज आहे.जेवढी गरज माणसाला भाकरीची आहे त्या पेक्षा अधिक माणसाला बुध्दाची गरज आहे..असे डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुध्द म्हणजे सर्वज्ञ ह्याचा अर्थ सृष्टीतील सर्व चराचर गोष्टीचे सम्यक ज्ञान ,जे जगातील सर्व विषयासमधी प्राप्त झालेले ज्ञान असते त्याला सम्यक समंबुध्द असे म्हणतात. बुध्द म्हणजे क्रांतिकारक लढा,अन्यायकारक गोष्टीचा ,अन दुःखाचा मुळापासून शोध घेणे म्हणजे बुध्द होय ऋषिपतनाच्या मृगदाय वना मध्ये पाच परिव्राजकाना,धर्मोपदेशक करावयाचा निश्चय केल्यावर सर्वप्रथम त्यांनी पाच परिव्राजकांना आपल्या धम्माचे ज्ञान सांगितले होते..ते पाच परिव्राजक म्हणजे 1. कौडिण्य २.अश्वजित,३.महानाम ४.काश्यप ५.भद्रिक होत. या पाच परिव्राजकांना आर्यसत्याचा उपदेश दिला.तो असा की, दुःखाचे या जगात अस्तित्व आहे हे सत्य आहे .हे सत्य आधी स्विकारा. दुख समुदय आहे,म्हणजे या दुखाला कारण आहे,दुःखाचा निरोध आहे ,म्हणजे या दुःखाचा निरोध होऊ शकतो .दुःख नष्ट होणे ,त्यानंतर निब्बान मिळू शकते .दुःख निरोध- गामिनी -प्रतिपदा ,,म्हणजे दुःख निरोधाचा जो मार्ग तो हाच आहे की मध्यम मार्ग (मज्झिमा पटिपदा) हे सदोदित सत्य असणाऱ्या गोष्टी,असल्यामुळे त्यांना आर्यसत्य म्हणतात.
प्रथम तीन आर्यसत्यावर बुध्दधम्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे आणि चौथे आर्यसत्य बुध्दधम्माचे नीतीशास्त्र आहे.३,4,५,८,10….तीन त्रिरत्ने ,चार आर्यसत्ये,पाच पंचशिल,आठ अष्टशील,दहा दसशील आहेत.जातीपातीच्या पोलांदी भींतीना पाडून बुध्द भारत भ्रमण करत राहिले ४५वर्ष सतत,चरक भिक्कवे चारिकं,बहुजण हिताय बहुजण सुखाय,लोकानुकंपाय अत्थाय,हिताय ,सुखाय देवमनुस्सान ,देसेत्थ भिक्कवे धम्मं मज्झेकल्याणं पयियोसान कल्याण ,सात्थं सव्यंजनं परिपुण्णं परिशुध्दं ब्रह्मचरियं पकासेथ ।. असे हे धम्मचक्र परिवर्तन यापुर्वी कुणी ही केले नाही. कारण,अनेक धर्मसस्थापंक होऊन गेले त्यांनी स्वताःला देवाचा,अल्लाचा ,देवपुत्राचा दर्जा स्वताःला श्रेष्ठ ठेवण्यासाठी निर्माण केला.आणि मनुष्याला परालंबी केले.देवाच्या.व कर्मकांडाच्या इशार-यावर नाचणारे बाहुले त्यांनी माणसाला केले.पण बुध्दाने माणसाला स्वावलंबी बनवले स्वंयःप्रकाशीत बनवले. देवाच्या गुलामीतून काढुन टाकले.धर्म म्हणजे गुलामी आहे आणि धम्म म्हणजे या गुलामीतुन मुक्ती..बौध्द धम्माचा पुनर्जन्म सिध्दांत रोचक आहे ,त्याचा संबंध निर्मिती पुननिर्मितीशी आहे,त्यांचा सबंधं मरणोत्तर पुनर्जन्माशी व तसेच आत्माच्या कल्पनेशी अजीबात नाही ,हेच बौध्द धर्माचे पुनर्जन्म सिध्दांताचे वेगळे पण होय तमाम मानव जातीला दुःखातुन.नष्ट करून . नैतिकतेचा नीतीशास्त्रावर बंधुभाव वाढवून युध्दास नाकारले .कारण युध्दामधून परत नवे युध्द जन्माला येऊ शकतात..परंतू मैत्री प्रेमाच्या सल्ल्याने मार्ग निघाला तर वैर-याला प्रेमाने जिंकता येते.हेच गमक आहे मैत्रीचे.म्हणून मैत्री व्यापक असावी संकुचित नसावी.
युध्द न होता मैत्री प्रेमाने राज्य प्रस्थापित करणे .कारण वैराने वैर वाढत जाते.तोच श्रेष्ठ मनुष्य होय की तो वैर-यालाही प्रेमाने जिंकतो हाच बुध्दाचा विजय होय.प्रा,ड्वाईट गोडार्ड म्हणतात, जा जगी जेवढे धर्मसस्थापंक होऊन गेले त्यात बुध्द हे एकमेव असे थोर संस्थापक होते की त्यांनी मानवातील विद्यमान निहित शक्ती जाणली,ही निहित शक्ती माणसाला कोणत्याही बाह्य शक्तीवर निर्भर न राहता मुक्तीपथावर अग्रसर करू शकते. हे बुध्दाच्या धम्माचे कार्यकारणभाव आहे हे सर्वात वेगळे देखणे पण होय..हेच त्यांचे सौदर्य होय.म्हणूनच बुध्द म्हणतो ये एहिपस्सिको. या आणि तपासून पाहा.अश्या धर्माची दिक्षा धम्मराज अशोक सम्राटाने घेतली तेव्हा सम्राट अशोकाचे राज्य संपूर्ण जबुंदिपात होते.असा सौर्वभौमतत्व राजा कलिंग युध्दाचा रक्तपात पाहुन त्यांना जीवनाची ग्लानी आली.सम्राट अशोकांच्या संपर्कात उपगुप्त भिक्षू आला,उपगुप्ताकडून त्याने बौध्दधमाची दिक्षा घेतली तो दिवस अशोकाविजया दशमीने ओळखला जाऊ लागला, संपूर्ण जबुंदिपात शांततेचा प्रज्ञासुर्य उगवला आणि धम्मचक्र गतीमान होऊ लागले सशस्त्र युध्द न करण्याचा त्याने निश्चय केला.
सिध्दार्थ गौतम बुध्दाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सर्व ठिकाणी त्याने चैत्र विहार बांधले ८४,००० स्तुप बांधून शिलालेख कोरले.व बुध्द धम्म या जगात पुन्हा नव्याने माणसांना जीवन दान देत राहीला.आपल्या मुलांना देशोदेशी बुध्द,धम्माच्या प्रचारार्थ पाठवले.ही जागतीक क्रांती झाली.बौध्द राजांनी या भारतावर बाराशे वर्ष राज्य केले..जात पात .विषमतेचा विरूद्ध बुध्दाने अनेक देशावर आणि प्रर्यायाने जगावर धम्मक्रांतीतुन वैज्ञानिक क्रांती निर्माण केली.जपान,चीन.थाँयलँड.हे देश आजही जगात आपल्या नावाचा ठसा ठेवून जगात नावारूपाला आले आहेत.बुध्दाचा जन्म जरी भारतात झाला तरी भारतापेक्षा इतर देशांनी जास्त बुध्द अंगीकारला आहे.बुध्दाचे तत्वज्ञान हे विवेकशिलतेचे उत्तम उदाहरण आहे बुध्द धम्माने संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित केले आहे बुध्द एक महान शोधाचे नाव आहे
म्हणूनच बुध्द म्हणतात.
- परे च न विजानन्ति मयमेत्थ यमामये ।
- येच तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा..।।
अर्थात-अज्ञ लोकांना कळत नाही की आपण सर्वांना येथून जावे लागणार आहे .ज्यांना हे कळले त्याचे सर्व कलह मिटतात.जातीपातीचा.भुकीचा,अज्ञानाचा,विटाळाचा कलह, कलह नुसता माजला होता.या कलहामध्ये अनेक शतके बर्बाद झाली. तरी माणुसपणा जीवंत होत नव्हता.पण १४ आँक्टोबर १९५६साली धम्मचक्र गतीमान झाले. ज्या दिवशी चक्रवर्ति सम्राट अशोक राजाने धम्म दिक्षा ज्या दिवशी घेतली त्या दिवसाला अशोकविजयादशमी म्हणतात.आणि त्याच दिवशी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी भंत्ते महाथेरो चंद्रमणी यांच्या हस्ते धम्मदिक्षा घेतली.त्यांच्या समवेत जवळजवळ सात लाख लोकांनी धम्म दिक्षा घेतली जगाच्या इतिहासात ही धम्मक्रांती विश्वशांती साठी बुध्द तत्वज्ञानाची गरज ठरली.
धम्मक्रांतीचे महामेरू असलेले कायदे पंडीत,बोधीसत्व,प्रज्ञासुर्य क्रांतीसुर्य,बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्दाचा धम्म देऊन मेलेल्या मनाला नव चेतना दिली..डाँ.बाबासाहेब आंबेडकरांची महाप्रज्ञा ,त्यांची विव्दवत्ता संपुर्णच विश्वाचे प्रश्न घेऊन त्यांच्या प्रज्ञेपुढे आक्रंदन करीत होती,(शिका ,संघटित ,व्हा संघर्ष करा )या ब्रीद वाक्याने समाजमनाला उब आली . तसेच त्यांचे क्रांतिकारक विचार त्यांना नव्या दिक्षीतांचे हक्क,स्वाभिमान आत्मभान,आत्मविश्वासाठी प्रेरक झाले, शिक्षणाचे आकाश खुले केले लोक नव्या जगामध्ये नव्या धम्मामध्ये लोक नांदू लागली बहरू लागली,शिकू लागली.अधिकारी होऊ लागली नवे जीवन जगू लागली.बाबासाहेबांनी केलेली धम्माची पुनर्रचना म्हणजे धम्मदिक्षा सोहळा होय.
बावीस प्रतिज्ञांमध्ये पंचशीलाचा अंतर्भाव केलाच आहे सम्यक तत्वाचा ही केला आहे बावीस प्रतिज्ञांमध्ये दहा पारमितांचा अंतर्भाव झालेलाच आहे .धम्माचेच संक्षिप्त रूप बावीस प्रतिज्ञेला म्हणता येईल.बुध्द आणि धम्म हे जर धम्मविश्वाचे संविधान असेल तर बावीस प्रतिज्ञा त्या विश्वसंविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका म्हणता येईल.भारत, बहुधर्मी,बहुभाषी,आणि बहुसंस्कृती असलेला देश आहे या देशाचे सतत परिवर्तन तथा आधुनिकीकरण होणे ही गरजेचे आहे या साठी न्यायदेवतेला लोकशाहीचा प्राण म्हटले एकावन्नाव्या अनुच्छेदामध्ये. धार्मिक,भाषिक प्रादेशिक,किंवा व वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा वा बंधूभाव वाढीला लावण्यासाठीचे ध्येय संविधानाने हे तत्व भारतीय लोकापुढे ठेवले आहे.या मधून सर्वाना एकोप्याचा संदेश मिळतो समता, बंधुता, एकता वाढीस लागते आहे पण आजकाल आपण बघतो काय होत आहे.यांचे कारण असे की संघटित नसणे वा एकसंध नसणे.या मुळे एका विशिष्ट वर्गाला कोणी रोखू शकत नाही.पण तो जनतेत बंधूभाव वाढीला लावण्याचे ध्येय आणि निष्ठा संविधानाने भारताच्या लोकापुढे ठेवले आहे म्हणजे भारतीय लोकांना मुलतत्ववादातून बाहेर काढण्याचे ध्येय संविधानाचे आहेदेशाला आधुनिक जगाकडे नेण्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी खुप कष्ट वेचले .समाज.आणि देशाचे प्रश्न त्यांच्या समोर होते. राज्यशास्त्र, इतिहास, धर्म,शिक्षण,घटनाशास्त्र,मानववंशशास्त्र हे त्यांचे क्रांतीकारी विषय होते.या विषयातुन त्यांनी बुध्द मानवतेला दिला. बुध्द हा तारतो.तो मारत नाही. विषमत्ता ही मारते.ती तारत नाही. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमत्ता नष्ट केली आणि बुध्दाची मानवता वादी मुळे जग भर समानेती फुले जगभर दिसू लागली.याचे कारण म्हणजे धम्मदिक्षा होय.
जातीपातीच्या .विटाळाच्या अज्ञानाच्या या अन्यायातुन निघण्यासाठी जातीपातीचा रोगावर बुध्दाची फुंकर जरूरीच आहे.म्हणूनच बाबासाहेब आंबेडकराना अभिप्रेत असलेला देश निर्माण करण्यासाठी संविधानात बुध्द ठेवून या देशाला नवी चेतना देण्याच काम जर कुणी केले असेल तर ते फक्त डाँ..बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.म्हणूनच ते विश्व रत्न ठरतात.
- बाबासाहेब से क्रांतीसे हसने लगा मनमोर
- सारे जग मै गुंज उठा है बस ये ही एक शोर
- कि भाई चलो बुध्द और..चलो बुध्द कि और
- कल चाँद भी लेगा दिक्षा और सुरज भी लेगा दिक्षा
- अब पृथ्वी भी कह रही है इसी मै है
- मेरी सुरक्षा ..चांदणी इस बात पर दे रही जोर
- के चलो बुध्द और चलो बुध्द की और
- सुनीता इंगळे
- मुर्तिजापूर
- 72 18 69 43 05