Skip to content
कामास जायला मी, लाजत मुळीच नाही
दामात काम देतो , वाकत मुळीच नाही
अन्याय फार करतो, मुद्दाम कोण मजवर
ताकीद त्यास देतो, मारत मुळीच नाही
हातास काम द्या मज, उपकार घेत नाही
कष्टात राबतो मी, मागत मुळीच नाही
दुस-यास प्रेम देणे, ठाऊक या मनाला
मी फालतू कुणावर, भाळत मुळीच नाही
आता सुजाण झालो, सांभाळले स्वतःला
झाला चुकून तंटा, बागत मुळीच नाही
काळीज फाटले हे, प्रेमात कैकदा हो
आहे तसाच जगतो, टाचत मुळीच नाही
मी बोलतो हमेशा, निर्भीड- बोचणारे
मज पाय चाटण्याची, आदत मुळीच नाही
Like this:
Like Loading...
Related