आपल्याला वाईट सवयी त्यागायच्या असतात. जीवनशैली सुधारायची असते. पण हा बदल एका रात्रीत होणं शक्य नसतं. त्यामुळे स्वतकडून अतिरिक्त अपेक्षा बाळगू नका. सगळ्या वाईट सवयी एकदम सोडू नका. एक-एक पाऊल पुढे टाका. रोज चार कप चहा होत असेल तर दोनवर आणा. आठवड्यातून तीन वेळा बर्गर-पिझ्झा खात असाल तर प्रमाण एकवर आणा. अशा प्रकारे हळूहळू चुकच्या सवयी मोडा. भरपूर पाणी प्या.
यामुळे बर्याच समस्या दूर होतात. आवडणार्या पदाथार्ंपासून थोडं लांब रहा. समजा तुम्हाला पिझ्झा खूप आवडतो. एका वेळी तुम्ही भरपूर पिझ्झा खाता. मग तो खाऊ नका किंवा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करून खा. नकार द्यायला शिका. यामुळे दिवसभरात शरीरात कमी कॅलरी जातील आणि वजनही कमी होईल. टू-व्हलर बाजूला ठेवा आणि भरपूर चाला. शक्य तितकं आणि शक्य तिथे चाला. बाईकचा वापर कमीत कमी करा. घरातली कामं करा. जिने चढा. शक्य तितकी हालचाल करा. यामुळे अतिरिक्त कॅलरी खर्च होतील. वेट ट्रेनिंग हा व्यायामाचा चांगल ा प्रकार आहे. कार्डिओपेक्षाही वेट ट्रेनिंगकडे वळा. यामुळे तुम्ही बळकट व्हाल. स्नायू पीळदार बनतील.