असे सुखी समाधानी
तेथे लक्षुमीचा वास
नांदे सदा आबादणी !!
लेकी बाईचं जीवन
जसं वाह्यत रे पाणी
देई सुख दोन्ही घरी
तिची अमृताची वाणी !!
माय, लेक, सासु, सून
काकू,मावशी,बहीण
घट्ट विणते रे कशी
नात्या, गोत्याची रे वीण !!
नार घडोली देवानं
मन तीच रे प्रेमळ
दया,मायेची मुरती
देई जगण्याचं बळ !!
दुःख गिळते पोटात
हासू ठेवते ओठात
नार शोषिक शोषिक
जशी गाय रे गोठ्यात !!
लेक देवाची निर्मिती
लेक विश्वाची निर्माती
कोटी देव पाळण्याची
आहे दोरी तिच्या हाती !!
औट घटकेची दारा
जन्म जन्माची ती माय
लेकबाय ह्या विश्वाची
आदिशक्ती आदिमाय !!
देवा सदा सुखी राहो
लेक बाई घरी दारी
सदा सुखाचा संसार
तिच्या येऊ दे पदरी !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा.पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556