हिवाळ्यात पचनशक्ती उत्तम राहते. त्यामुळे या दिवसात काहीही खाल्लं तरी पचतं, असं म्हटलं जातं. मात्र, या दिवसातही आहाराकडे विशेष लक्ष दिलंजायला हवं. त्या बाबतचा हा कानमंत्र..
थंडीत मिळणार्या गाजर, नवलकोल आदी भाज्या पौष्टिक असतात. थंडीपासून शरीराचं रक्षण करणार्या असतात. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू आदी आजारांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या सेवनाचा लाभ होतो. थंडीत ग्रीन टीचं सेवनही उपयुक्त ठरतं. ग्रीन टी मध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे घातक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अँटीऑक्सिडंट मदत करतात. हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते. गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात साखरेऐवजी मध घालावं. हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. संत्री, दाक्ष आदी फळातील क जीवनसत्त्वामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉॅल कमी करण्यासोबत ही फळं चयापचय क्रिया वाढवतात. या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. कबरेदकांचं प्रमाण जास्त असणारे ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023