रक्तदाब कमी होणं अनारोग्याला आमंत्रण ठरतं. म्हणूनच रक्तदाब योग्य पातळीवर आणण्यासाठी उपाय योजायला हवे. काही घरगुती उपायही या कामी उपयुक्त ठरु शकतात. पहिली बाब म्हणजे द्रव पदार्थांचं सेवन करा. पाण्याचं मुबलक प्रमाण असणारी फळं खा.
उष्णतेमुळे रक्तदाब कमी झाला असेल तर शरीराला थंडावा मिळेल, असं काही तरी करायला हवं. वातानुकुलीत वातावरणात जा किंवा काही तरी थंड प्या. मान आणि चेहर्यावर बर्फ फिरवता येईल. खूप घाम येत असेल तर तथे फार वेळ थांबू नका. घामामुळे शरीरातलं पाणी कमी होऊन रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. विशिष्ट जीवनसत्त्वं आणि खनिजांच्या कमतरतेमुळेही रक्तदाब कमी होऊ शकतो. कच्ची फळं आणि भाज्यांचं सेवन करून ही समस्या बर्याच प्रमाणात कमी करता येईल. ब, ब ९ आणि ब १२ या जीवनसत्त्वांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासोबतच कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर अशा भाज्या आणि फॉलिक अँसिड असणार्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. रक्तदाब नियंत्रणात राखण्यात ब १२ जीवनसत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते. तंदुरूस्तीसाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. यामुळे हृदयाला बळकटी मिळते. शिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
Related Stories
September 3, 2024