शरीरांतर्गत यंत्रणा सुरळत कार्यरत राहण्यासाठी रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू असावा लागतो. रक्तदाब कमी अथवा जास्त झाल्यास शारीरिक यंत्रणा प्रभावित होते. या कारणामुळे शरीरातील काही महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच रक्तदाबातील चढउताराकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं. रक्तदाब असंतुलित असल्याचं काही लक्षणांवरुन दिसून येतं. आज यासंबंधी चर्चा करु.
हात-पाय सुन्न होणं, बधीरता जाणवतं हे रक्तप्रवाहातील असंतुलनाचं द्योतक ठरु शकतं. रक्तप्रवाह कमकूवत असेल तर ही लक्षणं जाणवतात.
हातापायांच्या बधिरतेबरोबच शरीरावर, विशेषत हाता-पायांवर सूज असेल तर रक्तप्रवाह सदोष असल्याचं समजावं. बराच काळपर्यंत पायावर सूज रहात असेल तर पायांचा अल्सर होण्याची दाट शक्यता असते.
थोड्याशा कष्टाने थकवा जाणवणं, थोडी हालचाल केल्यास दमून जाणं ही रक्तप्रवाह असंतुलित असल्याची लक्षणं आहेत. या दोषामुळे शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पोषक तत्व आणि ऑक्सिजनची प्राप्ती होत नाही परिणामी प्रचंड थकवा जाणवतो.
सदोष रक्तप्रवाहामुळे पायांच्या नसांवर दबाव जाणवतो आणि नसा फुगीर दिसू लागतात.
हात-पाय गार पडणं हेदेखील रक्तप्रवाहातील असंतुलनाचं लक्षण आहे. रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू नसेल तर शरीराचं तापमान सामान्य रहात नाही, परिणामी शरीर गार पडत असल्याचं जाणवतं.
रक्तदाबात सतत चढउतार होत असेल तर शरीरात व्हटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता जाणवते. परिणामी शरीराची प्रतकारक्षमता कमी होते. म्हणूनच सतत आजारपण असल्यास रक्तप्रवाहातील असंतुलनाचा धोका लक्षात घ्यावा. रक्ताचा अयोग्य आणि असंतुलित दाब तुमच्या प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम करु शकतो.
रक्तदाब सदोष असल्यास छातीवर एक प्रकारचा दाब जाणवतो. ही समस्या एंजाइना पेक्टरिस या नावाने ओळखली जाते. हृदयाला रक्तप्रवाह नीट होत नसल्यास हा त्रास संभवतो.
रक्तप्रवाह असंतुलित असल्यास रक्तात ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि त्वचेचा वर्ण काळसर-निळसर बनतो. म्हणूनच हा त्रास असेल तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वतरुळं तयार होतात आणि केसगळतीचं प्रमाण वाढतं.
Related Stories
September 3, 2024