- येता पावसाच्या सरी
- धरा येई ओथंबून ।
- हर्ष होई चोहीकडे
- नाचे मोर आनंदून ।।
- भिजलेल्या धरेसम
- कुठे अत्तराला वास? ।
- बाप धरेस पुजतो
- सारे भुलूनिया त्रास ।।
- चोहीकडे हिरवळ
- पसरता वाटे छान ।
- जणू धरणीमातेला
- योग्य मिळाला सन्मान ।।
- होतो कास्तकार सुखी
- टिळा ललाटी लावतो ।
- बीज अंकुरण्या मग
- त्वरे पेरणी करतो ।।
- पांडुरंगा मायबापा
- कृपा अशीच ठेवजो ।
- पावसात सगळ्यांना
- आनंदाने भिजवजो ।।
- शब्दसखा:- अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७