कार्य महान करुनी जाई,
अंधारलेल्या या जीवनात
ज्ञानज्योती पेटवुनी देई ||१||
होतं आम्हां गुलामीचं जीणं,
ज्ञान नव्हतं आम्हां ठाव,
पेटवुनी मशाल क्रांतीची,
घातला रुढीवर समतेचा घाव ||
शेण,चिखलाचा मारा,
त्रास भोगुनी तू सारा,
वाट वणव्याची चालुनी,
वाहता केला ज्ञान वारा ||
परंपरा ,रुढीच्या हो प्रथा,
लिहिल्या स्त्रीमुक्ती व्यथा,
घालुनी गुलामीवर घाव,
गाडल्या मातीत तू कथा ||
ज्योत तू लावली ज्ञानाची,
या महाराष्ट्राच्या भुमीत,
ज्ञान सावित्रीचं घेवू लागले,
सारे मानव अखंड जगात ||
अबला नारी झाली सबला,
ज्ञानज्योतीच्या ह्या ज्ञानानं,
होती अक्षम झाली सक्षम,
पुस्तक लेखनीच्या पानानं ||
स्वतः जळूनी, उजेड दिला,
नारींना केलं प्रकाशमान,
मुक्त केले नारी जातीस,
तोडून बेड्या गुलामीच्या ||
स्त्रीमुक्तीची आद्य प्रणेत्या,
क्रांतीज्योती सावित्रीबाई,
काव्यप्रतिभा शिक्षणतज्ञ,
ज्ञानज्योती सावित्रीमाई ||
काय वर्णावी तुझी महती,
देवू या उपमा मी किती,
माय सावित्री धन्य आहेस,
उपकार थोर तुझे ह्या जगती ||
शब्द तुझे निसर्गाचे,
लेखनी तुझी मानवतेची,
झिजली अखंड समतेठाय,
धन्य युगस्त्री सावित्री माय ||
- कवी प्रविण खोलंबे.