सध्या आपल्याकडे कोरोना विषाणूच्या धोक्यांची चर्चा होत असली तरी यूरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग अत्यंत घातक ठरू शकतो. वैद्यकीय भाषेत याला यूरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन (यूटीआय) असं म्हणतात. इंडियन हेल्थ र्जनलने मध्यंतरी याबाबत संशोधन केलं. जगभरात दरवर्षी १५ कोटी लोकांना ही व्याधी जडत असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ४0 टक्के महिलांना आणि १२ टक्के पुरुषांना आयुष्यात एकदा तरी मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होते. भारतात दहापैकी पाच महिलांना आणि तीन पुरुषांना मूत्रमार्गाचा संसर्ग होतो.
मूत्रमार्गाच्या जंतूसंसर्गाबाबत जागरूकता कमी असल्यामुळे आपल्याला हा आजार झाल्याची कल्पानच रुग्णांना नसते. याच कारणामुळे वेळेत उपचार होत नाहीत आण हा संसर्ग गंभीर स्वरुप धारण करतो. पुरुषांमधला मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो.
या आजाराची काही लक्षणं आहेत. वारंवार बाथरूमला जावं लागणं हे या संसर्गाचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. मात्र याकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. हाच निष्काळजीपणा संसर्गवाढीसाठी कारणीभूत ठरतो. जंतूसंसर्गामुळे मूत्रमार्गालगत सौम्य स्वरुपाच्या जखमा झाल्यामुळे जळजळ जाणवते. मूत्र मार्गालगत जळजळ जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जंतूसंसर्गामुळे बरेचदा मूत्रातून रक्तही येऊ शकतं. मूत्रमार्गातल्या जखमांचं प्रमाण वाढल्यास असं होऊ शकतं. निष्काळजीपणामुळे या जखमांची तीव्रता वाढू शकते. मूत्रमार्गाचं अधिक प्रमाणात झालेलं नुकसानही याला कारणीभूत ठरू शकतं. या टप्प्यावरचा निष्काळजीपणा धोकादायक करू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देतात. पोटाच्या खालच्या भागात सातत्याने वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
दूषित अन्न तसंच पेयांच्या सेवनामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसंच जीवनसत्त्वं, खनिजं तसंच अन्य पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळेही असं होऊ शकतं. ब जीनवसत्त्वाच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे शरीर विविध रोगजंतूंचा सामना करू शकत नाही. परिणामी मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलांना मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका असतो. ड जीवनसत्त्वाची कमतरता, प्रतिकारशक्ती कमी असणं, मूतखडा अशा कारणांमुळेही मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023