- जीव लावून मी जोडली माणसे
- ताळ सोडून ती वागली माणसे
- दुःख झेलून मी आजही राहिले
- ना कधी कोणती तोडली माणसे
- घात होतो खरा जाणुनी घेतले
- संकटी ही खरी जाणली माणसे
- देव भोळा जरी वाटला आपला
- भक्त वेडी बरी वाटली माणसे
- माय सिंधू खरी पोरक्यांची सदा
- जीवना धन्य ती भासली माणसे
- शोभा वागळे
- मुंबई.
- 8850466717