- तुच्छ लेखले सर्वांना
- अपशब्द वापरले
- गरिबांच्या श्रमावरी
- माझे कुटुंब पोसले
- केला जुलूम अन्याय
- झाले मलिन चारित्र्य
- घडा पापांचा भरला
- नाही उरले पावित्र्य
- अती वाईट वागलो
- कडू मिळाली ही फळे
- आता भोगतोय दुःख
- अश्रू न सांगता गळे
- दिन चांगले येता मी
- उतमात फार केला
- नियतीस नसे मान्य
- बोजवारा मग झाला
- माझ्या पापांचा मी धनी
- कोणी नाही वाटेकरी
- जीवनाच्या भविष्याचा
- मीच झालो मारेकरी
- नशा माज संपत्तीचा
- अंगी जडला हा रोग
- दोष कुणास मी देवू
- माझ्या नशिबाचे भोग
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता.बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227