मुंबई : अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला बॉबी देओल सध्या आर्शम वेब सीरीज तसंच इतर चित्रपटांमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये धडाक्यात एंट्री करणारा बॉबी देओल मधल्या काळात मात्र अचानक बॉलिवूडमधून गायब झाला होता. दारूच्या आहारी जाऊन त्याने आपले करिअरच संपवले होते. त्याने स्वत: याचा खुलासा केला आहे.
बॉबी देओलने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा मला स्वत:चीच लाज वाटू लागली होती. कोणीही माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. यानंतर मी दारूच्या आहारी गेलो. आपण दिवसभर दारूच्या नशेत असायचो असे बॉबी देओल सांगतो.
यावेळी आपण कोणचीही पर्वा करत नव्हतो असंही तो सांगतो. जवळपास तीन वर्ष हे सगळं सुरु होते. पण कोणीही बॉबी देओलच्या मदतीला आले नाही. बॉबी देओलने सांगितलं होतं की, ह्लवडील दिवसभर घरातच असतात, कामावर जात नाही असा प्रश्न माझ्या मुलांना पडला होता. त्यांच्या डोळ्यातही ते दिसत होते. माझी आई आणि पत्नीलाही चिंता सतावू लागली होती. यानंतर मला आपण चुकत असल्याची जाणीव झाली आणि माझ्यात बदल झालाह्व. आपली परिस्थिती पाहून मलाच धक्का बसला आणि आयुष्य बदलण्यासाठी वाट पाहू शकत नाही असा निश्चय केला. आता मी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून व्यस्त राहू लागलो आहे. मला पुन्हा काम मिळू लागलं असून आता मी यातून बाहेर पडणार नाही.
बॉबी देओलने राजकुमार संतोषी यांच्या बरसात (१९९५) चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले. आता तर बॉबी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सक्रीय आहे. बॉबी देओलच्या पत्नीचं नाव तानिया असून त्यांना दोन मुलं आहेत.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023