- शिंमग्याचा सण
- पुरणाची पोई
- साई संग होई
- सासऱ्या घरी !
- मौज मस्ती सारी
- रंगात रंगावे
- हसावे खेळावे
- साई संगे !
- ऊधळावे रंग
- भिजवावे अंग
- प्रेमाचा जल्लोष
- साई संगे !
- भांगाचा रे प्याला
- गटागटा प्याला
- मर्कट त्या लीला
- साई संगे !
- मायेचा तो झरा
- पोरांची मावशी
- प्रेमाची गा उशी
- माझी साई !
- -वासुदेव म. खोपड़े
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- आकोला 9923488556