- कुणीही खुशाल विका दारू
- चालवावा वरली मटका
- संवेदनाहीन काळीजांना
- केवळ पैशांचाच चटका !!
- वर्दीसंगे नमक हरामी
- हप्ते घेऊन देऊन करू
- पैशांसाठीच जगतो आम्ही
- केवळ पैशासाठीच मरू !!
- खुशाल म्हणा हो भ्रष्टाचारी
- जन महसुल आम्ही चोरू
- शासनाचेच तिजोरिवर
- डल्ला आम्ही सहमते मारू !!
- जनतेचेच आम्ही चाकर
- जन जिवनाशी होळी खेळू
- आरोग्य शिक्षण कचेरीत
- दलाल,भडवे आम्ही पाळू !!
- कामचोर असू शिरजोर
- आम्ही करतो शासन सेवा
- भाबड्यांचा करून शिमगा
- खाऊ आम्ही पुरणाचा मेवा !!
- होई शिमग्याची बोम्ब आम्ही
- केवळ चार दिवस मारू
- झाले गेले विसरून त्यांचा
- राष्ट्र पदके सत्कार करू !!
- -वासुदेव महादेवराव खोपड़े
- सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
- अकोला9923488556