मुंबई : बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर विवाहबंधनात अडकली. तिने फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्न केले आहे. काही मोजक्या पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. त्याचबरोबर, ती लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते.
कोण आहे राजेश करमारकर?
राजेश करमारकर हा प्रसिद्ध फोटोग्राफर असून त्याने अनेक मराठी कलाकारांचे फोटोशूट केले आहे.
बालक पालक हा शाश्वतीचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली.
बालक पालक हा चित्रपट रवी जाधव यांनी दिग्दशिर्त केला होता. यामध्ये तिने डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती.बालक पालक चित्रपटानंतर नंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्येदेखील काम केले आहे.चाहूल आणि पक्के शेजारी या मालिका तिच्या लोकप्रिय ठरल्या होत्या.
शाश्वतीचे बालपण पुण्यात झाले. बालपणापासूनच तिने अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आता शाश्वतीने इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर करत लग्न झाल्याची माहिती दिली आहे.
Related Stories
September 3, 2024