उत्तम पगार, कामाच्या सोयीच्या वेळा, पुढे जाण्याची संधी यामुळे युवावर्ग बँंकिंगकडे आकर्षित होतो. बँकिंग क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रथम श्रेणीत पदवीधर होणं गरजेचं असतं. बँकेतल्या नोकरीसाठी अर्ज करताना वयोर्मयादा महत्त्वाची असते. ओपनसाठी वेगळे आणि आरक्षित वर्गासाठी वेगळे नियम आहेत. पदवीधरांसाठी बँकेत दोन पदं असतात. एक म्हणजे कारकून (क्लॅरिकल) तर दुसरं प्रोबेशनरी ऑफिसर. या दोन्ही पदांसाठी पात्रतेच्या वेगळ्या अटी आणि नियम असतात. क्लार्क पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांना बारावी आणि पदवी परीक्षेत किमान ६0 टक्के गुण असावे लागतात. बँकिंग क्षेत्राशी संबंधित डिप्लोमाही उपयोगी पडू शकतो. विशिष्ट वयोगटातले तरुण-तरुणी या पदासाठी अर्ज करू शकतात. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात प्रोबेशनवर ठेवलं जातं. या काळातल्या कामगिरीच्या बळावर कायमस्वरुपी नोकरी दिली जाते. या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५ किंवा ६0 टक्के गुणांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी दिली जाते. कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक असतं.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023